कळमडू येथे एकाच दिवसात विक्रमी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:17+5:302021-09-02T04:38:17+5:30
कळमडू हे आठ ते नऊ हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात हजारो लोक कोविडची लस घेण्यापासून वंचित होते. ...

कळमडू येथे एकाच दिवसात विक्रमी लसीकरण
कळमडू हे आठ ते नऊ हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात हजारो लोक कोविडची लस घेण्यापासून वंचित होते. त्यामुळे दहीवद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कळमडू येथील जास्तीत जास्त लोकांना कोविडची लस देण्यासाठी मोहीम राबवली. यात पुरुष, महिला व तरुण मिळून एकाच दिवसात ११०० लसीचे विक्रमी लसीकरण करण्यात आले. या मोहिमेसाठी दाहिवद प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेश पाटील, डॉ. सारंग पाटील, डॉ. स्वप्नील निकम, डॉ. निकिता धांडे, आरोग्य सेवक एन. एन. विसपुते, निखील कागुल, उदय चव्हाण, पी. व्ही. दामोदर, आरोग्य सेविका पी. सी. भरते, एस. जे. बाविस्कर, के. डी. फुलपगारे, आशा सेविका एस. एस. मोरे, कविता पाटील, सुनंदा पाटील, विठाबाई सोनवणे, रंजना केदार, रेखा गढरी, अनिता वाघ, गीता वाघ, जिजाबाई पाटील यांनी परिश्रम घेतले.