ब्राम्हणशेवगे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रमी लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:20 IST2021-09-14T04:20:18+5:302021-09-14T04:20:18+5:30

मिशन कोरोनामुक्त ब्राह्मणशेवगे अंतर्गत भारतीय जनता पार्टी, ब्राह्मणशेवगे व आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ब्राम्हणशेवगे येथे जम्बो लसीकरण ...

Record vaccination on the background of corona at Brahmanshevge | ब्राम्हणशेवगे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रमी लसीकरण

ब्राम्हणशेवगे येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रमी लसीकरण

मिशन कोरोनामुक्त ब्राह्मणशेवगे अंतर्गत भारतीय जनता पार्टी, ब्राह्मणशेवगे व आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ब्राम्हणशेवगे येथे

जम्बो लसीकरण शिबिर संपन्न झाले.

पहिल्या व दुसऱ्या डोससाठी ४०० कोविशिल्ड लसी उपलब्ध झालेल्या होत्या. दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेपर्यंतच गावातील कोरोना योध्दा यांचे मदतीने उपलब्ध लसीचे लसीकरण संपन्न झाले. ब्राम्हणशेवगे येथील जि.प. प्राथमिक शाळेत लसीकरण करण्यात आले. ब्राम्हणशेवगे आरोग्य उपकेद्राचे अधिकारी व कर्मचारीतर्फे उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल पर्यावरणप्रेमी व जलमित्र सोमनाथ माळी यानी पारिजातकाचे रोप भेट देऊन आभार मानले.

ब्राम्हणशेवगे ग्रामस्थांना ऑनलाइन नोदणीसाठी ब्राम्हणशेवगे येथील आकाश पाटील, बंटी पाटील, मयूर बाविस्कर, अतुल पाटील, विशाल नेरकर, गणेश पवार, लोकेश माळी, प्रदीप बाविस्कर, ज्ञानेश्वर राठोड, विष्णू राठोड, सुभाष बाविस्कर, नानाभाऊ चव्हाण, प्रमोद देसले, नीलेश खैरे यांनी परिश्रम घेतले. आरोग्य केंद्र शिरसगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राम्हणशेवगे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ. सागर चव्हाण, आरोग्य सेविका सोनाली पाटील, आशा सेविका मंगल पवार, मदतनीस सोनाली पाटील यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Record vaccination on the background of corona at Brahmanshevge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.