जिल्ह्यात १ लाख १२ हजार ८५१ नागरिकांचे विक्रमी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:43+5:302021-09-09T04:22:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाने रविवारी एक लाख ६५१ नागरिकांचे लसीकरण करून केलेला विक्रम बुधवार १ ...

जिल्ह्यात १ लाख १२ हजार ८५१ नागरिकांचे विक्रमी लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा प्रशासनाने रविवारी एक लाख ६५१ नागरिकांचे लसीकरण करून केलेला विक्रम बुधवार १ ला १२ हजार ८५१ नागरिकांचे लसीकरण करून मोडला आहे. जिल्हाभरातील ११६ पेक्षा जास्त लसीकरण केंद्रांवर आरोग्य यंत्रणेने हे लसीकरण केले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसात १ लाख १२ हजार ८५१ नागरिकांना डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यात बुधवारी सकाळी २ लाखांपेक्षा जास्त लसींचे डोस उपलब्ध होते. त्यानंतर त्यात जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना २ लाख ८ हजार १३० कोविशिल्डचे आणि ७३६० कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले होते. त्यातून जिल्हाभरात एकाच दिवसात १ लाख १२ हजार ८५१ कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
या आधी रविवारी जिल्हाभरात १ लाख ६५१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी लगेचच १ लाख १२ हजार ८५१ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. हा जिल्हा आरोग्य यंत्रणेने केलेला एक विक्रमच आहे. जिल्हाभरात ११६ पेक्षा जास्त लसीकरण केंद्रांवरही प्रशासनाने ही कामगिरी केली आहे.