शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात ‘दुपर्णी चिरायता’ दुर्मीळ वनस्पतीची नोंद; महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 08:14 IST

‘दुपर्णी चिरायता’ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘चीरायीता बायफोलीया’ असे आहे.

- अजय पाटीलजळगाव : जैवविविधतेने समृद्ध सातपुडा पर्वतरांगामध्ये अत्यंत दुर्मिळ वनस्पतींची नोंद आतापर्यंत झाली आहे. आता या जंगलात ‘दुपर्णी चिरायता’ ही दुर्मिळ वनस्पती आढळून आली आहे, असा दावा इकरा एच. जे. थीम महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. तन्वीर खान यांनी केला आहे.‘दुपर्णी चिरायता’ या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘चीरायीता बायफोलीया’ असे आहे. जगामध्ये चिरायतीच्या ७७ प्रजाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये केवळ नऊ प्रजाती असून, महाराष्टÑात पहिल्यांदाच या वनस्पतीची नोंद झाली आहे. ‘दुपर्णी चिरायता’ या वनस्पतीला एक लहान व एक मोठे असे दोन माने (फाटे) असतात. तसेच निळसर रंगाचे एक फुल असते. पर्वत शिखरांच्या उतारावरील ओलसर खडकाळ जागेवर ही वनस्पती आढळते.भारतात सर्वप्रथम १८८४ मध्ये ब्रिटीश वनस्पती अभ्यासक क्लार्क यांनी पश्चिम बंगालच्या जंगलात ही वनस्पती शोधली. त्याचप्रमाणे २००८ मध्ये अरुणाचल प्रदेशातील ‘गिरी’ व १९९७ मध्ये मध्य भारतातील मुदगल या ठिकाणी चिरायतीची नोंद झाली आहे.तोरणमाळ व अमलीबारी भागात आढळली वनस्पतीप्रा. डॉ. तन्वीर खान हे अभ्यासासाठी सातपुडा पर्वत रांगेत नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ व अमलीबारी येथे गेले असताना त्यांना ही वनस्पती आढळली. या वनस्पतीची माहिती डॉ. खान यांनी पुणे विद्यापीठाचे डॉ. मिलींद सरदेसाई व बीएसआय कोईमतूर येथील डॉ. राजीवकुमार सिंग यांना पाठविली. त्यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.यासाठी डॉ. खान यांना डॉ. एम. बी. पाटील व अजहर शेख यांचे सहकार्य लाभले. या वनस्पतीवर डॉ. खान यांनी तयार केलेला शोधनिबंध ‘इंडियन फॉरेस्टर’ या विज्ञान पत्रिकेला पाठविण्यात आला आहे.‘दुपर्णी चिरायता’ सारखी अत्यंत दुर्मिळ वनस्पती सातपुडा पर्वतरांगेत मिळणे ही महाराष्टÑासाठी अभिमानाची बाब आहे. या वनस्पतींचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष संवर्धन मोहीम राबविण्याची गरज आहे.- डॉ. तन्वीर खान,वनस्पती अभ्यासक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगावenvironmentपर्यावरण