पाळधी येथे माजी सैनिक, सैनिक यांच्या कुटुंबीयांचा सत्कार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:20 IST2021-08-19T04:20:56+5:302021-08-19T04:20:56+5:30
यावेळी पाळधी, माळपिंप्री, रोटवद तसेच मोरगाव येथील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना स्पर्धा परीक्षा पुस्तके व खुर्च्या वाटप, नांद्रा, ...

पाळधी येथे माजी सैनिक, सैनिक यांच्या कुटुंबीयांचा सत्कार सोहळा
यावेळी पाळधी, माळपिंप्री, रोटवद तसेच मोरगाव येथील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना स्पर्धा परीक्षा पुस्तके व खुर्च्या वाटप, नांद्रा, सवतखेडा येथील सैन्यभरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना ट्रॅक सुटचे वाटप करण्यात आले
पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. हा सोहळा ग्रामपंचायत चौकात पार पडला. यावेळी जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जि. प. माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जे. के. चव्हाण, सभापती जलाज तडवी, जि. प. सदस्य अमित देशमुख, अमर पाटील, नगरसेवक बंटी वाघ, बाबुराव अण्णा घोंगडे, सुरेश जोशी, नीता पाटील, सरपंच प्रशांत बाविस्कर, संदीप सुशिर, देवचंद परदेशी, मनोज नेवे, अमित पाटील उपस्थित होते.
सूत्रसंचालन नेरी येथील प्रशांत पाटील यांनी तर आभार नरेंद्र माळी यांनी मानले.
180821\dsc_5743.jpg
सैनिकांनी का चा माता पिता सन्मान करताना जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष साधना महाजन