चोपडा येथे सत्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:16 IST2021-07-27T04:16:21+5:302021-07-27T04:16:21+5:30

संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने संताजी जगनाडे महाराज ...

Reception ceremony at Chopda | चोपडा येथे सत्कार सोहळा

चोपडा येथे सत्कार सोहळा

संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने संताजी जगनाडे महाराज मंदिर, श्रीरामनगर, चोपडा येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक, पत्रकार, समाजसेवक, पुरस्कारप्राप्त गुणवंतजन, गुणी विद्यार्थी, संतजन, सेवानिवृत्त यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जिल्हा तेली समाज महासंघाचे अध्यक्ष के.डी. चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा सूतगिरणीचे चेअरमन व माजी आमदार कैलास पाटील, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, पत्रकार संघाचे अध्यक्ष ललित जैन, नगरसेवक महेश पवार,, चोपडा शिवसेना अध्यक्ष रामचंद्र देशमुख, ज्येष्ठ पत्रकार अनिल पालीवाल, चोपडा सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, अशोक साळुंके, पत्रकार संजय सोनवणे, महेश शिरसाठ, ह.भ.प. बापू महाराज लासूरकर, ह.भ.प. गोपीचंद महाराज, ह.भ.प. विठोबा महाराज,

ह.भ.प. विजय महाराज, मनोहर पाटील, धनंजय पाटील, संगीता प्रकाश चौधरी, वैशाली विनोद चौधरी, कुंदनलाल बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लासूर ग्रामपंचायतीत सरला कुंदनलाल बोरसे यांची निवड झाल्याने, प्रकाश शंकर चौधरी यांना गुणवंत पुरस्कार, समाज सारथी पुरस्कार तसेच विविध पदांवर निवड झाल्याने, शिवाजी दगडू चौधरी यांची चोपडा नगरपालिकेत कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यात आर.डी. पाटील, चंद्रकांत पाटील. एस.आर. सोनवणे, श्रीकांत नेवे, तुषार पाटील, संदीप ओली, सचिन जयस्वाल, श्याम जाधव, महेश शिरसाट, डॉ. सतीश भदाने, महेश पाटील, मिलिंद सोनवणे, अनिल पालीवाल, छोटू भाऊ वारडे, रवींद्र पाटील, डी.बी. पाटील, विश्वास वाडे, संजय बारी, राजेंद्र पाटील, कैलास बाविस्कर, आत्माराम पाटील, हेमंत गायकवाड, मिलिंद वाणी आदी पत्रकारांचा माजी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

२७/१

Web Title: Reception ceremony at Chopda