शौचालयांसाठी सव्वा कोटींचे अनुदान प्राप्त

By Admin | Updated: September 22, 2015 23:47 IST2015-09-22T23:47:52+5:302015-09-22T23:47:52+5:30

धुळे : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मनपाला पहिल्या टप्प्यात एक कोटी 27 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आह़े

Receive one and a half crore grant for toilets | शौचालयांसाठी सव्वा कोटींचे अनुदान प्राप्त

शौचालयांसाठी सव्वा कोटींचे अनुदान प्राप्त

धुळे : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मनपाला पहिल्या टप्प्यात एक कोटी 27 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आह़े हे अनुदान वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी लाभार्थीना वितरित केले जाणार आह़े

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या पाश्र्वभूमीवर मनपातर्फे शहरात शौचालय सव्रेक्षण मोहीम काही दिवसांपूर्वी राबविण्यात आली़ त्यात शहरातील 70 हजार 144 मालमत्ताधारकांपैकी 46 हजार 929 कुटुंबांकडेच वैयक्तिक शौचालय असल्याचे आढळून आले, तर 23 हजार 215 कुटुंबीयांकडे शौचालये नसल्याची माहिती समोर आली होती़ वैयक्तिक शौचालयांसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येकी 12 हजार रुपयांची मदत दिली जाणार आह़े वैयक्तिक शौचालये उभारण्यासाठी 12 हजार 248 कुटुंबांनी मनपाकडे अर्ज केले आहेत़

पहिल्या टप्प्यात सहा हजार रुपयांचा निधी लाभार्थीना दिला जाणार असून शौचालयाच्या बांधकामाची माहिती घेऊन दुस:या टप्प्यातील निधी वितरित केला जाणार आह़े

Web Title: Receive one and a half crore grant for toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.