घरफोड्याला पुन्हा पोलीस कोठडी
By Admin | Updated: June 16, 2015 14:52 IST2015-06-16T14:44:51+5:302015-06-16T14:52:44+5:30
जळगाव व भुसावळ येथे भरदिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार अनिल पूनमचंद राठोड याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्या. ए.एम.मानकर यांनी दिला.

घरफोड्याला पुन्हा पोलीस कोठडी
जळगाव : जळगाव व भुसावळ येथे भरदिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार अनिल पूनमचंद राठोड (वय ३५) रा.रायपूर ता.जळगाव याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्या. ए.एम.मानकर यांनी १५ रोजी दिला.
घरफोडी प्रकरणात त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारतर्फे अँड.राजेश गवई व आरोपीतर्फे अँड.राशिद पिंजारी यांनी काम पाहिले.
त्याला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मानकर यांनी याआधी १२ रोजी दिला होता.