Reading of the Constitution Preamble on Republic Day at Muktainagar | मुक्ताईनगर येथे प्रजासत्ताक दिनी संविधान प्रस्तावनेचे वाचन

मुक्ताईनगर येथे प्रजासत्ताक दिनी संविधान प्रस्तावनेचे वाचन


मुक्ताईनगर : येथील तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण पूर्वी आज संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. प्रथमच अशा स्वरूपात संविधान प्रस्तवनेचे वाचन झाल्याने नागरिकां कडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

तहसीलदार श्वेता संचेती यांनी ध्वजारोहण पूर्वी ध्वनिक्षेपका तून संविधानाच्या प्रस्तवनेचे वाचन केले तदनंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले
प्रजासत्ताक दिनाला संविधान प्रस्तवनाचे वाचनाच्या या उपक्रमाचे नागरिकां मधून उत्स्फूर्तपणे स्वागत केले प्रसंगी आ. चंद्रकांत पाटील यांच्या सह तालुक्यातील अधिकारी आणि मान्यवर नागरिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी, अनेक सेवा निवृत्त कर्मचारी आणि माजी सैनिक उपस्थित होते.

Web Title: Reading of the Constitution Preamble on Republic Day at Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.