A re-victim of a ditch on the highway | महामार्गावर खडड्याचा पुन्हा एक बळी
महामार्गावर खडड्याचा पुन्हा एक बळीपारोळा : पारोळा तालुक्यातील दळवेल जवळ महामार्गावर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्न करत असताना मालवाहू चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात त्यावरील क्लिनर इस्लामोद्दीन गुलाब वारीस (वय ४०) रा. खुदागंज जिल्हा सितापूर (उ.प्र.) हा जागीच ठार होऊन अन्य तिघे जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
राष्टÑीय महामार्ग क्रमांक सहावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना त्याकडे राष्टÑीय रस्ते विकास प्राधिकरणाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे निरपराध व्यक्तींचा बळी जात आहे. शनिवारी यामुळेच पुन्हा अपघाताची घटना घडली.
सकाळी घडली दुर्घटना
१४ रोजी सकाळी ६.३० वाजता महामार्ग क्रमांक ६ वरून धुळ्याकडून जळगावकडे मालवाहून वाहन क्रमांक एम.एच. १८- बीजी ४५२४ हे येत असताना दळवेल जवळ गुडलक पेट्रोल पंपाच्या जवळ असलेला मोठा खड्डा चुकवत असताना गाडी उलटली. त्यात इस्लामोद्दीन गुलाब वारीस या गाडीवरील क्किनरच्या डोक्याला मार लागल्याने व गाडीखाली तो दाबला गेल्याने जागीच ठार झाला. अपघातात चालक महेंद्र पाटील रा. पिंप्राळा जि. जळगाव तसेच गणेश सुभाष गुंजाळ रा. पथराड ता. धरणगाव, सुशील कुमार हे तिघे जखमी झाले. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

 

 

Web Title: A re-victim of a ditch on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.