सिंधी कॉलनीत पुन्हा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:13+5:302020-12-04T04:46:13+5:30
जळगाव : बऱ्याच दिवसांपासून शांत असलेल्या शहरातील सिंधी कॉलनीत कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. या भागात एक रुग्ण आढळून ...

सिंधी कॉलनीत पुन्हा शिरकाव
जळगाव : बऱ्याच दिवसांपासून शांत असलेल्या शहरातील सिंधी कॉलनीत कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. या भागात एक रुग्ण आढळून आला असून, यासह शहरात १६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ४० रुग्ण आढळले. तर ४४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. एकही मृत्यू नसल्याने गुरुवारी जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. शहरात बाधितांची संख्या २०च्या खालीच आहे, गुरुवारच्या अहवालामध्ये शहरात १६ रुग्ण आढळले. सक्रिय रुग्णांची संख्या १७० झाली आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा घटली आहे.
थंडी नसल्याने दिलासा
कोरोनाचा प्रादुर्भाव थंडी वाढल्यानंतर वाढेल, असा अंदाज अनेक डॉक्टरांनी वर्तविला होता. जळगावात सध्या तापमान सामान्य असल्याने कोरोनाची भीतीही कमी असून, संसर्ग कमी असल्याचे चित्र आहे, त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याचा धोकाही कमी झाल्याचे चित्र आहे.
या भागात रुग्ण
सिंधी कॉलनी, संभाजीनगर, रेल्वे क्वाॅर्ट्स, सदोबानगर, महाबळ या भागात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.