अंधारयुगातील प्रकाशाचा किरण...... ऑनलाइन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:01+5:302021-09-24T04:19:01+5:30
त्याच्या माध्यमातून ज्या पिढीने मोबाईल पाहिला नव्हता, वापरलेला नव्हता, ती पिढी ते आज तंत्रज्ञान शिकली आणि मुलांना त्यातील तंत्रज्ञान ...

अंधारयुगातील प्रकाशाचा किरण...... ऑनलाइन शिक्षण
त्याच्या माध्यमातून ज्या पिढीने मोबाईल पाहिला नव्हता, वापरलेला नव्हता, ती पिढी ते आज तंत्रज्ञान शिकली आणि मुलांना त्यातील तंत्रज्ञान अवगत करून, त्यांच्यात विकसित करून हे तंत्रज्ञान आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी पोहोचविले आहे. सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून या कोरोना परिस्थितीत मुले बाहेर न पडता घरातच बसून नेटच्या माध्यमातून ऑनलाइन अभ्यास करू लागली. शिक्षक, पालक, विद्यार्थी, नवीन तंत्रज्ञान शिकून अद्यवायत करण्यात प्रयत्नशील आहे. काहीजण तंत्रज्ञानाबद्दल अनभिज्ञ आहेत. ते मुलांसोबत तंत्र विकसित करताना दिसत आहेत. तंत्रज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद असल्याने आणि ती उघडणार नसल्याने त्यांना घरातच बसून ऑनलाइन शिक्षण द्यावे लागणार आणि त्यातूनच आजच्या युगातील प्रकाशाचा किरण म्हणून ऑनलाइन शिक्षण, ऑनलाईन क्रांतीचा उगम झाला.
ऑनलाईन पद्धतीचे विद्यार्थ्यांना भरपूर फायदे आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, त्यांना एकाग्र ठेवणे या गोष्टींवर जास्त भर देण्यात आला; कारण ऑनलाइन शिक्षण ही आजच्या परिस्थितीतील अपरिहार्यता बनली आहे. आज ऑनलाईन पद्धतीने अध्ययन करणे ही काळाची गरज आहे. आजचा विद्यार्थी आणि त्याचे शिक्षण लॉकडाऊनमुळे बंद झाले म्हणून पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षण अवलंबिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा वापर अनिवार्य आहे. काही विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिक्षण प्राप्त करायला आवडते, तर काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकायला आवडते. ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांची वेळेची बचत होईल; तसेच आपण आपल्याला पाहिजे ते शिक्षण प्राप्त करू शकतो. शिक्षण घेत असताना आलेल्या अडचणी शिक्षकांशी संपर्क साधून सोडू शकतो; तसेच ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आणखी एक सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन, अध्ययनाची सवय लागली आणि प्रत्येक विद्यार्थी स्वतःचा अभ्यास पूर्ण करू लागला. अगदी कमी कालावधीतच ऑनलाइन शिक्षणप्रणालीशी बहुतांश विद्यार्थी जोडले गेले. त्यांचे बंद झालेले शिक्षण ऑनलाइन पद्धतीने हळूहळू सुरू झाले. ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना शिक्षणाची तसेच नवीन तंत्रज्ञानाची गोडी निर्माण झाली. प्रत्येक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी समजून घेऊन त्यांवर मात करीत आहे. तो स्वतः ऑनलाइन शिक्षण पद्धती स्वीकारून अध्ययनासाठी नवनवे मार्ग खुले करू लागला. ऑनलाइन शिक्षणप्रणालीमध्ये पद्धतीमध्ये शिक्षकांइतकीच पालकांची भूमिकासुद्धा तेवढ्याच प्रमाणात महत्त्वाची आहे.