रवींद्र महाजन यांना उद्यान पंडित पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 20:35 IST2019-09-22T20:34:58+5:302019-09-22T20:35:04+5:30
जामनेर : शासनाच्या वतीने कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा २०१७ चा उद्यान पंडित पुरस्कार ...

रवींद्र महाजन यांना उद्यान पंडित पुरस्कार
जामनेर : शासनाच्या वतीने कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा २०१७ चा उद्यान पंडित पुरस्कार जामनेर येथील प्रगतिशील शेतकरी तसेच मातोश्री नर्सरीचे संचालक रवींद्र माधवराव महाजन यांना जाहीर झाला.
राज्यातील विविध कृषी पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली असून उद्यान पंडित पुरस्कारांसाठी नऊ जणांची निवड करण्यात आली आहे.
महाजन यांनी आपल्या शेतात केलेले विविध प्रयोग जसे वनशेती, आंबा, मोसंबी या फळपिकांची घनपद्धतीने लागवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण, पाणलोट विकास, जलव्यवस्थापन, फळबागांना पाणी देण्यासाठी सुक्ष्म नियोजन, मातोश्री नर्सरीच्या माध्यमातून जिल्ह्यात तसेच राज्यभरात तयार झालेल्या फळबागा व त्यातून त्यांनी प्रगती साधली. तसेच शेतकरी आत्महत्येची कारणे आणि उपाय या विषयावर स्वत: नाट्यलेखन करून आत्महत्या रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक क्षेत्रातील कार्य आदी कामांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.