रावेरला केबल चोरट्यांचा धूमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST2020-12-05T04:25:02+5:302020-12-05T04:25:02+5:30
रावेरला केबल चोरट्यांचा धूमाकूळ सहा शेतकर्यांच्या केबल वायर लंपास रावेर जि. जळगाव : चिनावल शेत शिवारात चोरट्यांनी ...

रावेरला केबल चोरट्यांचा धूमाकूळ
रावेरला केबल चोरट्यांचा धूमाकूळ
सहा शेतकर्यांच्या केबल वायर लंपास
रावेर जि. जळगाव : चिनावल शेत शिवारात चोरट्यांनी सहा शेतकऱ्यांच्या महागड्या केबल
वायर चोरून नेल्या. . या केबल वायर्सची किंमत लाखोंच्या घरात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले झाले आहे
चिनावल शिवारातील शेतांमधून विहीर व कूपनलिकांवरील केबल वायर
कापून चोरून नेल्या. यात चंद्रकांत मिठाराम भारंबे , प्रविण ईच्छाराम नेमाडे, महेश भागवत
भारंबे , रवींद्र भास्कर महाजन, पंकज सिताराम महाजन, गिरधर लक्ष्मण बोरोले यांच्या शेतांमधील लाखो रुपयांची केबल वायरसह साहित्य चोरट्यांनी लांबवले.
चोरीच्या घटना होवून संबंधित पिक संरक्षण सोसायटी व पोलीस काहीच कारवाई करीत नसल्याने चोरटे बिनधास्त झाले आहे. केबल वायर चोरीचा तपास होण्याची मागणी त्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे .