रावेरला खान्देश माळी महासंघातर्फे ५ जानेवारीला व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 03:39 PM2018-12-22T15:39:44+5:302018-12-22T15:42:04+5:30

रावेर येथील खान्देश माळी महासंघातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सप्ताहानिमित्ताने ५ जानेवारी २०१९ रोजी लेखिका कविता जितेंद्र्र पवार यांचे ‘आम्ही सावित्री - २१ व्या शतकाच्या’ या विषयावर व्याख्यान आयोजिले आहे.

Raver on lecture on January 5 by Khandesh Mali Mahasangh | रावेरला खान्देश माळी महासंघातर्फे ५ जानेवारीला व्याख्यान

रावेरला खान्देश माळी महासंघातर्फे ५ जानेवारीला व्याख्यान

googlenewsNext
ठळक मुद्देक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त मिळणार व्याख्यानाची मेजवानीविविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच महिलांचा ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्काराने होणार सन्मान

रावेर, जि.जळगाव : येथील खान्देश माळी महासंघातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सप्ताहानिमित्ताने ५ जानेवारी २०१९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता फैजपूर येथील लेखिका कविता जितेंद्र्र पवार यांचे ‘आम्ही सावित्री - २१ व्या शतकाच्या’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
तालुका व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया कर्र्तृत्ववान पाच महिलांना ‘सावित्रीच्या लेकी’ या जीवन गौरव पुस्स्कार २०१९ ने गौरविण्यात येणार असल्याची माहिती महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षा शकुंतला रमेश महाजन व तालुकाध्यक्ष पिंंटू महाजन यांनी दिली.
या व्याख्यानाचे प्रायोजकत्व जय सीताराम किराणा यांनी स्वीकारले आहे. यावेळी मार्गदर्शक कांतीलाल महाजन, श्रीराम महाजन, रामकृष्ण महाजन, श्यामराव चौधरी, एन.आर.महाजन, अतुल महाजन, दिनेश महाजन, योगेश मानकर, गणेश महाजन, प्रकाश महाजन, पिंटू महाजन, विमलबाई महाजन, गंगाबाई महाजन, सुमित्राबाई महाजन, प्रमिला महाजन, छाया महाजन आदी उपस्थित होते.

Web Title: Raver on lecture on January 5 by Khandesh Mali Mahasangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.