रावेरला सरासरी केवळ ११ मि. मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:35 IST2021-09-02T04:35:41+5:302021-09-02T04:35:41+5:30
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूर्व रात्रीपासून सोमवारी अधूनमधून झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या हजेरीने बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर जणूकाही चांगला पाऊस होत असल्याचा ...

रावेरला सरासरी केवळ ११ मि. मी. पाऊस
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूर्व रात्रीपासून सोमवारी अधूनमधून झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या हजेरीने बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर जणूकाही चांगला पाऊस होत असल्याचा आभास होत असला तरी, वस्तुतः मात्र तालुक्यात आज सरासरी ११ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. खरीप हंगामासाठी जोमदार पावसाची प्रतीक्षा असली तरी, पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने शेतकरीवर्ग चिंतेच्या सावटात सापडला आहे.
रावेर महसूल भाग मंडळात कमाल १६ मि. मी. तर खिरोदा प्र. यावल महसूल मंडळात किमान ९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. निंभोरा महसूल मंडळात १३ मि. मी., ऐनपूर मंडळात १२ मि. मी., खिर्डी मंडळात ११ मि.मी., सावदा मंडळात १२ मि. मी., खानापूर मंडळात १० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.