भडगाव पंचायत समितीच्या नूतन उपसभापतीपदी रावण भिल्ल बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:20 IST2021-08-14T04:20:16+5:302021-08-14T04:20:16+5:30

रावण भिल्ल यांचा सत्कार सुरुवातीला आमदार किशोर पाटील यांनी केला. या निवडीवेळी भाजपच्या पंचायत समिती सभापती डाॅ. ...

Ravana Bhill unopposed as the new Deputy Chairman of Bhadgaon Panchayat Samiti | भडगाव पंचायत समितीच्या नूतन उपसभापतीपदी रावण भिल्ल बिनविरोध

भडगाव पंचायत समितीच्या नूतन उपसभापतीपदी रावण भिल्ल बिनविरोध

रावण भिल्ल यांचा सत्कार सुरुवातीला आमदार किशोर पाटील यांनी केला. या निवडीवेळी भाजपच्या पंचायत समिती सभापती डाॅ. अर्चना पाटील, शिवसेनेच्या सदस्या हेमलता पाटील, रामकृष्ण पाटील, रावण भिल्ल हे चार सदस्य उपस्थित होते.

भाजपच्या सदस्या अलकाबाई पाटील या गैरहजर होत्या. या निवडीत ३ शिवसेना, १ भाजप असे संख्याबळ आहे. पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत आहे. यापूर्वीच आमदार किशोर पाटील यांनी ठरविल्यानुसार ही उपसभापती पदाची संधी रावण भिल्ल यांना मिळाली आहे.

पंचायत समितीचे उपसभापती प्रताप सोनवणे यांचे आजारपणामुळे निधन झाले होते. या रिक्त जागेसाठी ही निवड घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, सहायक गटविकास अधिकारी संजय लखवाल, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, पंचायत समिती सभापती डाॅ. अर्चना पाटील, सदस्य रामकृष्ण पाटील, सदस्या हेमलता पाटील, जि.प.चे माजी सदस्य विकास पाटील, संजय पाटील, जालिंदर चित्ते, बाजार समिती संचालक युवराज पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डाॅ. विलास पाटील, डाॅ. विशाल पाटील, माजी उपसभापती राजेंद्र परदेशी, सरदार परदेशी, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रतन परदेशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप शेंडे, विनोद परदेशी, प्रकाश परदेशी, भिकन परदेशी, नारायण परदेशी, भानुदास देवरे, विजय पाटील, मळगाव सरपंच गुलाब पाटील, प्रताप परदेशी, ज्ञानेश्वर पाटील, दीपक पाटील, सचिन परदेशी, अशोक परदेशी, सुभाष मोरे, संतोष देवरे, गौतम मोरे, कैलास परदेशी, दिलीप परदेशी, विठ्ठल सोनवणे, कार्यालयीन प्रमुख दिलीप चिंचोरे यांच्यासह बांबरुड, वाडे, मळगाव, लोणपिराचे, कजगाव आदी गावांतील नागरिक हजर होते.

बांबरुड प्र. ब. गावात पुन्हा उपसभापती पद मिळाल्याने व वाडे पंचायत समिती गणाला उपसभापती पदाची पुन्हा संधी मिळाल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. डाॅ. विशाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन उपसभापती रावण भिल्ल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Ravana Bhill unopposed as the new Deputy Chairman of Bhadgaon Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.