नशिराबादला रथोत्सव पूजन साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:19 IST2021-09-22T04:19:49+5:302021-09-22T04:19:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नशिराबाद : सामाजिक एकात्मता व अहिंसेचे प्रतीक असलेल्या व सुमारे ८६ वर्षांची अखंड परंपरा असलेल्या नशिराबाद ...

नशिराबादला रथोत्सव पूजन साधेपणाने
लोकमत न्यूज नेटवर्क
नशिराबाद : सामाजिक एकात्मता व अहिंसेचे प्रतीक असलेल्या व सुमारे ८६ वर्षांची अखंड परंपरा असलेल्या नशिराबाद जैन दिगंबर मंदिरातर्फे श्री १००८ भगवान नेमिनाथ यांचा रथोत्सव मंगळवारी यंदा साधेपणाने करण्यात आला. जागेवरच रथोत्सव पूजन आरती करून पाच पावले रथ ओढून उत्सवाची परंपरा कायम ठेवण्यात आली.
सकाळी भगवान नेमिनाथ यांच्या मूर्तीस महाभिषेक पूजन झाले. त्यानंतर मूर्ती रथावर विराजमान करण्यात आली. पारंपरिक पूजन व आरती करून साधेपणाने उत्सवाची सांगता झाली. भगवान नेमिनाथ यांची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान करून उत्सवाची सांगता झाली. भाद्रपद महिन्यात वद्य प्रतिपदेला भगवान नेमीनाथ यांचा रथोत्सव असतो. रथाचे द्वार उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते झाले. रथामध्ये भगवानाची मूर्ती विराजमान करण्याचं सौभाग्य व रथाच्या पूजनाचा मान मधुकर हरी जैन व लताबाई जैन या परिवारास मिळाला. जलाभिषेक रमेश जैन व दिव्य शांती धारा मंगेश जैन व परिवारास मिळाले. महाआरती सुनंदा अनिल जैन यांच्या हस्ते झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, शिवसेना शहर प्रमुख विकास धनगर , युवासेना प्रमुख चेतन बऱ्हाटे, जयंतीलाल जैन, नितीन चोपडा आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिराचे अध्यक्ष दिनेश जैन, उपाध्यक्ष मंगेश जैन, सचिव महावीर जैन, सदस्य प्रकाश जैन, विजय जैन, राजेंद्र जैन, वर्धमान जैन, महेश जैन, भूषण जैन यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.