चाळीसगावात रयत सेनेतर्फे दानवे यांच्या प्रतिमेला जोडामारो आंदोलन

By Admin | Updated: May 12, 2017 13:17 IST2017-05-12T13:17:22+5:302017-05-12T13:17:22+5:30

रयत सेनेच्या वतीने 12 रोजी तहसील कार्यालयासमोर रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला ‘जोडा मारो आंदोलन’ करण्यात आले.

Rath Sena connects the image of Danave in Chalisgaon | चाळीसगावात रयत सेनेतर्फे दानवे यांच्या प्रतिमेला जोडामारो आंदोलन

चाळीसगावात रयत सेनेतर्फे दानवे यांच्या प्रतिमेला जोडामारो आंदोलन

 चाळीसगाव,दि.12- तूर खरेदीच्या संदर्भात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक:यांविषयी केलेल्या  विधानाच्या  निषेधार्थ   रयत सेनेच्या वतीने  12 रोजी तहसील कार्यालयासमोर  रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला ‘जोडा मारो आंदोलन’ करण्यात आले.  

दानवे यांची भाजपा  प्रदेश अध्यक्ष पदावरून  हकालपट्टी करावी तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु दिले जाणार नाही असा इशारा  रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी यावेळी दिला.  आंदोलनात   वाघडु चे माजी सरपंच भाऊसाहेब पाटील, प्रदेश संघटक पप्पू पाटील, सचिव प्रमोद वाघ, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष मयुर चौधरी, कार्याध्यक्ष भुषण पाटील, सागर पाटील, रोहित जाधव, विशाल निंबाळकर, सागर गायकवाड, सागर  धुमाळ, मुरलीधर कोठावदे, अनिल पाटील, केशव देवरे, महेंद्रसिंग महाले, कुलदिप पाटील, , समाधान पाटील, बी. आर. पवार, चेतन पवार, सुरज पवार, अजय चव्हाण, ,श्रीकांत पवार, प्रदीप मराठे, रंगनाथ मांडोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Rath Sena connects the image of Danave in Chalisgaon