कोरोना काळात गर्भपाताचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:09+5:302021-07-21T04:13:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कोरोना काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्भवती महिलांचे गर्भपातांचे ...

The rate of abortions decreased during the Corona period | कोरोना काळात गर्भपाताचे प्रमाण घटले

कोरोना काळात गर्भपाताचे प्रमाण घटले

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कोरोना काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्भवती महिलांचे गर्भपातांचे प्रमाण हे दहा टक्क्यांवर आले आहेत. यात नॉन कोविड यंत्रणा ही काही महिनेच सुरू असल्याने ही संख्या कमी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेत मात्र, गर्भवती बाधित होण्याचे तसेच बाळांनाही कोरोनाची लागण झाल्याचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा वाढले होते.

जिल्हा रूग्णालयातील गर्भपात

२०१९ - ७००

२०२० -५०

२०२१ (१५जुलैपर्यंत) -००

गर्भपाताची कारणे काय?

गर्भपाताची विविध कारणे असल्याचे डॉक्टर सांगतात. यात मातेच्या जीवाला धोका असणे, बाळात व्यंग असून ते जगण्याची शक्यता नसणे, किंवा मातेची मानसिक स्थिती अशा तीन कारणांनी गर्भपात होतो. यात वीस आठवड्याच्या आत गर्भपात करता येतो. त्यानंतर मात्र, न्यायालयाची परवानगी लागते, असे डॉक्टरांनी सांगितले.

गर्भ पोटात असताना कोरोना झाला तर...

अनेक गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण अधिक होते. यात महिलांनी योग्य खबरदारी घेतली, नियमीत औषधोपचार घेतले. तर बाळ सुरक्षित राहते. शिवाय प्रत्येक बाळाला कोरोना होईलच असे नाही, दुसऱ्या लाटेत जन्मल्यानंतर बाळांना कोरोना झाल्याची उदाहरणे होती. मात्र, पहिल्या लाटेत आईपासून बाळांना कोरोना झालेला नव्हता. आता गर्भवती महिलांचेही लसीकरण सुरू असून लस घेतल्यास महिला व बाळ दोघेही कोरेानापासून सुरक्षित राहू शकतात.

कोट

गेल्या दीड वर्षांपासून जीएमसीत नॉन कोविड यंत्रणा ही केवळ काही महिन्यांपूर्वीच सुरू होती. त्यामुळे गर्भपात या ठिकाणी कमी झाले आहे. गर्भपाताची विविध कारणे असतात. यात महिलेच्या जीवाला धोका असणे, बाळाला व्यंग असणे, अशी कारणे असतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विचार केला तर गर्भवतींचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक होते. अशा वेळी वेळेवर योग्य उपचार घेतल्यास माता व बाळ दोघीही सुरक्षित राहू शकतात. - डॉ. संजय बनसोडे, स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र विभागप्रमुख

Web Title: The rate of abortions decreased during the Corona period