शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
4
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
5
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
6
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
7
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
8
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
9
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
10
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
11
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
12
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
13
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
14
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
15
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
16
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
17
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
18
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
19
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
20
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
Daily Top 2Weekly Top 5

रतनलाल बाफना यांची ‘सुवर्ण भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:20 IST

हितेंद्र काळुंखे जळगाव : कोणतीही कला असो... एखाद्या कलावंताची छाप ही हटके असते. याचप्रकारे कोणताही व्यापार असो.. एखादा व्यापारी ...

हितेंद्र काळुंखेजळगाव : कोणतीही कला असो... एखाद्या कलावंताची छाप ही हटके असते. याचप्रकारे कोणताही व्यापार असो.. एखादा व्यापारी हा ग्राहकांच्या मनात एक विश्वासाचा ठसा उमटवून ठेवतो. याच धोरणानुसार ‘जहाँ विश्वास’ ही परंपरा है’ हे ब्रिद घेवून सोने- चांदीच्या व्यापार क्षेत्रात स्वत: सह जळगावचे नावही उंचीवर नेणारे रतनलाल सी. बाफना आज ८३ व्या वर्षीही पूर्ण वेळ काम करताना दिसतात.राजस्थान मधील भोपालगढ या गावात साधारण कुटुंबात रतनलाल बाफना यांचा जन्म झाला. वडील चुनीलाल बाफना यांचा लहानसा कपड्यांचा व्यापार होता. यातून घरखर्च जेमतेम भागायचा. यामुळे रतनलाल बाफना अवघ्या १९ व्या वर्षी केवळ १० वीचे शिक्षण आणि काहीतरी करायचे अशी उमेद अशा शिदोरीसह घराबाहेर पडले. १९५४ मध्ये ते आपले नशिब आजमावण्यासाठी जळगावमध्ये आले. प्रसिद्ध आर. एल. या सोन्याच्या पेढीत नोकरी केली. १०० रुपये पगारावर कामाची सुरुवात झाली. मेहनतीने काम केल्याने जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि पगारही. १९७४ सालात त्यांना १० हजारापर्यंत पगार गेला.व्यापाराचे गुण जागे झालेनोकरी दरम्यान रतनलाल बाफना यांनी काटकसरीने जीवन जगत असताना ५ लाख रुपये जमविले होते. वडील व्यापारी होते आणि हा गुणही रतनलाल बाफना यांच्यात होताच. हा गुण त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. १९७४ मध्ये १० हजाराची नोकरी सोडत त्यांंनी आता सराफबाजारातील सुभाष चौकाजवळ ज्या ठिकाणी सिल्व्हर हाऊस आहे, त्या ठिकाणी आर. सी. बाफना ज्वेलर्स या नावाने सोने- चांदीचे छोटे शोरुम सुरु केले. अवघ्या चौघा कामगारांच्या सहाय्याने त्यांनी हे इवलेसे रोप लावले. मेहनतीला नशिबाची साथ या ठिकाणी चांगलीच लाभली.मुलांची लाभली समर्थ साथव्यवसायाच्या विस्तारात मुलगा सुशीलकुमार (पप्पूशेठ) बाफना यांची समर्थ साथ रतनलाल बाफना यांना लाभली. कॉप्युुटराईज्ड कामकाज स्विकारत त्यांनी कामात सुलभता आणली. विविध डिझाईन तंत्रज्ञान आणले. सुशील कुमार यांच्या पाठोपाठ द्वितीय पुत्र सिद्धार्थ हे देखील व्यवसायात उतरले. हो दोघे भाऊ एमबीए असून शोरुम मध्ये महिलांना संधी देण्याचे कामही त्यांनी केले.सेवेचा वारसाही स्विकारलामिळालेल्या प्रचंड यशात ग्राहकांचा मोठा वाटा आहे, हे मानत रतनलाल बाफना यांनी समाजसेवेतही मोठे योगदान दिले आहे. अनेक वर्षांपासून ते अपंगांना तीन चाकी सायकलचे वाटप करीत असून वाजवी दरात गरजूंना अन्न मिळावे यासाठी ‘क्षुधाशांती’ केंद्रात योगदान दिले. तहानलेल्यांसाठी जलमंदिर उभारले. महिलांना शिवण वाटप, रुग्णांवर औषधोपचार आदी कार्यासह शाकाहाराचा प्रचार करीत गोसेवेसाठी कुसुंबा येथे भव्य गोशाळा उभारली. व्यापारासोबतच रतनलाल यांचा सेवेचा वारसाही त्यांच्यामुलांनीस्विकारलाआहे.आणि उभे राहिले भव्य ‘नयनतारा’हळूहळू प्रगतीपथाकडे वाटचाल होत राहिली. रनलाल बाफना यांनी १९८८ रोजी सराफ बाजारातच ‘नयनतारा’ हे भव्य शोरूम सुरू केले. काहीदिवसातच चांदीच्या दागिन्यांसाठी स्वतंत्र असे ‘पारसमहल’ हे नवे शोरूम १९९४ मध्ये सुरू करण्यात आले. बाफनांचा व्यवसाय बहरतच गेला.आज त्यांच्या जळगाव शहरातील तीन शोरूमसह औरंगाबाद, नांदेड व नाशिक येथेही या व्यवसायात त्यांनी यश मिळविले आहे.प्रामाणिकपणे काम केले तर यश हे नक्कीच मिळते. व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे असते. ग्राहकांच्या प्रेमामुळेच आपण प्रगती करु शकलो. आज मुलेही आपले काम चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत, याचा आंनद आहे.-रतनलाल सी. बाफना

 

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव