केळी फळपीक योजना निकष बदलासाठी रास्तारोको तूर्त स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 05:38 PM2020-10-10T17:38:48+5:302020-10-10T17:40:38+5:30

केळी उत्पादकांच्या शिष्टमंडळाला मुंबईत खासदार शरद पवार यांच्या भेटीची वेळ निश्चित झाली आहे.

Rastaroko immediately suspended for banana orchard scheme criteria change | केळी फळपीक योजना निकष बदलासाठी रास्तारोको तूर्त स्थगित

केळी फळपीक योजना निकष बदलासाठी रास्तारोको तूर्त स्थगित

Next
ठळक मुद्दे रावेर : शिष्टमंडळ मुंबईत खासदार शरद पवारांची घेणार भेटमुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचेही शिष्टमंडळ खासदार शरद पवार वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी जाणार

रावेर : केळी उत्पादकांच्या शिष्टमंडळाला मुंबईत खासदार शरद पवार यांच्या भेटीची वेळ निश्चित झाली आहे. यामुळे १२ रोजी होणारे रास्तारोको आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
केळी पिकाला विम्याचे संरक्षण देण्याऐवजी केळीबागा नामशेष करणारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारीत सुधारीत त्रैवार्षिक केळी फळपीक विमा योजनेतील निकष तातडीने बदलण्याच्या मागणीसाठी संतप्त केळी उत्पादकांनी केंद्र व राज्य सरकारच्या लपंडावाच्या निषेधार्थ १२ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शहरातील बºहाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावर आयोजित केले होते. त्यासंदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्याशी मुंबई येथील यशवंत प्रतिष्ठानमध्ये केळी उत्पादकांच्या शिष्टमंडळाला १२ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भेटीसाठी आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून वेळ निश्चित झाली आहे. यानंतर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीचे नियोजन असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश पाटील यांनी दिली.
दरम्यान, याच संघषार्तून मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचेही शिष्टमंडळ खासदार शरद पवार वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी जाणार आहे.

Web Title: Rastaroko immediately suspended for banana orchard scheme criteria change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.