रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्यानी केली सुटकेस कारची निर्मिती
By Admin | Updated: June 6, 2017 16:43 IST2017-06-06T16:43:50+5:302017-06-06T16:43:50+5:30
या उपकरणाच्या वापरामुळे संपूर्ण इंधनाची बचत होणार आहे.

रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्यानी केली सुटकेस कारची निर्मिती
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि 6- जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकेनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या विद्याथ्र्यानी इनोव्हेटिव पोर्टेबल सुटकेस या प्रोजेक्ट अंतर्गत कारची निर्मिती केली आहे. या कारच्या वापरामुळे हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होणार नाही व वातावरण शुद्ध करण्यास मदत होईल. तसेच या उपकरणाच्या वापरामुळे संपूर्ण इंधनाची बचत होणार आहे.
या साहित्याचा केला वापर
निर्मितीसाठी इलेक्ट्रिक हब मोटार, 48 होल्ट बॅटरी, इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर, सुटकेस, मिनी व्हील्स आदी उपयोगी सामग्रीचा वापर करण्यात आलेला आहे. उपकरणाच्या वापरण्यासाठी इंधनविरहित चाजिर्ग बॅटरीचा वापर करण्यात आलेला आहे. सोलर ऊर्जेवर देखील बॅटरी चार्ज करता येईल.
25 कि.मी.ची क्षमता
या कारचे वैशिष्टय़ म्हणजे तिला अपंग व्यक्ती देखील चालवू शकतो. एकदा चार्ज केल्यानंतर 30 च्या वेगाने 25 कि.मी. अंतर पार करण्याची क्षमता आहे. सोलर प्लेटचा वापर केल्यास प्रवास सलग होऊ शकतो. 80 किलो. पयर्ंत वजन असलेल्या व्यक्तीला वाहण्याची क्षमता आहे.
पार्किगची आवश्यकता नाही.
प्रवास झाल्यानंतर सुटकेस मध्ये कारची घडी करून कॅरी करू शकतात. या कारचा लहान मोठय़ा कंपन्या, विद्यापीठ व महाविद्यालयीन परिसर व लहान मोठय़ा रस्त्यावर वापर करू शकतो.
18 हजारात कारनिर्मिती
महाविद्यालयातील सुयोग गिरणारे, संकेत जाखेटे, मनीष बडगुजर, दुर्वास कोपरकर, अनंत शिंदे, निरज कलंत्री या विद्याथ्र्यांनी ही कार तयार केली. एका वेळी एकच व्यक्ती या कारच्या सहाय्याने प्रवास करू शकतो. या कारची निर्मिती करण्यासाठी 18 हजार इतका खर्च आला आहे. या विद्याथ्र्याना प्रा.गणेश बडगुजर यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्याथ्र्यांच्या यशाबद्दल कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य.डॉ.प्रभाकर भट, विभागप्रमुख प्रा.राजेश दहिभाते यांनी कौतुक केले.