‘रासेयो’चे स्वयंसेवक आता बेडसाइड असिस्टंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:20+5:302021-05-05T04:27:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रुग्णसेवेसाठी बेडसाइड असिस्टंट म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपलब्ध करून देण्याची मागणी शासकीय वैद्यकीय ...

‘रासेयो’चे स्वयंसेवक आता बेडसाइड असिस्टंट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रुग्णसेवेसाठी बेडसाइड असिस्टंट म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपलब्ध करून देण्याची मागणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यापीठाकडे केली आहे. त्यानुसार काही दिवसांतच विद्यापीठाकडून १५ रासेयो स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी दिली.
३० रोसेयो स्वयंसेवकांची मागणी
रासेयोचे स्वयंसेवक रुग्णसेवेसाठी बेडसाइड असिस्टंट म्हणून उपलबध करून दिल्यास रुग्णसेवा सुरळीत पार पाडता येईल व त्यांची या रुग्णालयास मदत होईल. बेडसाइड असिस्टंट म्हणून कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना संरक्षणात्मक सर्व साहित्य रुग्णालयाकडून उपलब्ध करून देण्यात येईल, असे ई-पत्र विद्यापीठाच्या रासेयो विभागाला जीएमसीच्या अधिष्ठातांनी पाठविल होते, तसेच ३० स्वयंसेवक उपलब्ध व्हावे, अशीही मागणी होती. त्यामुळे पंधरा रासेयो विद्यार्थी लवकरच बेडसाइड असिस्टंट म्हणून अधिष्ठातांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वयंसेवकांसाठी महाविद्यालयांना पत्रक पाठविण्यात आले आहे.