जीएमसीच्या सी ३ कक्षात दिव्यांग बालकांवर जलद उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:43+5:302021-08-13T04:20:43+5:30
जळगाव : हृदयविकारग्रस्त, दिव्यांग, मतिमंद बालकांवर जलद उपचार होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सी ३ कक्षात जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून डीईआसी ...

जीएमसीच्या सी ३ कक्षात दिव्यांग बालकांवर जलद उपचार
जळगाव : हृदयविकारग्रस्त, दिव्यांग, मतिमंद बालकांवर जलद उपचार होण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सी ३ कक्षात जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून डीईआसी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राचे स्वातंत्रदिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याठिकाणी ९ जणांची टीम या बालकांवर उपचार व त्यांचे समुपदेशन करणार आहे.
या कक्षात बालकांसाठी खेळणे, त्यांच्या उपचारासाठी आवश्यक मशिनरी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतिमंद, हृदयविकारग्रस्त, दिव्यांग अशा बालकांना जलद उपचारांची गरज असते, ज्यामुळे पुढील धोके टाळता येऊ शकतात. म्हणून हे जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
आयुष विभागाचा शुभारंभ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या गेटच्या जवळ असलेल्या इमारतीत वरच्या मजल्यावर आयुष विभागाकडून विविध उपचारपद्धती सुरू करण्यात आली आहे. याचाही शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या ठिकाणी पंचकर्माची सुविधा राहणार आहे.