जळगावात व्हिडीओ क्लिपचा धाक दाखवून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 11:53 IST2017-07-19T11:53:30+5:302017-07-19T11:53:30+5:30

पीडित युवतीस अत्याचारानंतर तीन महिन्याचा गर्भ राहिला.

Rape by threatening video clips in Jalgaon | जळगावात व्हिडीओ क्लिपचा धाक दाखवून बलात्कार

जळगावात व्हिडीओ क्लिपचा धाक दाखवून बलात्कार

लाईन लोकमतजळगाव, दि. 19 - युवतीवर केलेल्या अत्याचाराची व्हिडीओ क्लिप बनविली व या व्हिडीओ क्लिपचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आह़े याप्रकरणी धुळे येथील तरुणाविरोधात जिल्हापेठ पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेपंचवीस वर्षीय पीडित युवती मूळ देवपूर धुळे येथील असून ती जळगावातील गणेश कॉलनी परिसरात भाडय़ाच्या खोलीत वास्तव्यास असताना भावेश रामदास येवले (रा़धुळे) या तरुणाने अत्याचार केला़ यानंतर 3 एप्रिल 17 च्या रात्री ते 10 मे 17 दरम्यान भावेशने शिर्डी येथे लॉजवर तसेच जळगाव येथील पीडितेच्या खोलीमध्ये पीडितेच्या इच्छेविरूध्द अत्याचार केला. युवतीने नकार दिल्यावर संशयिताने अत्याचाराची व्हिडीओ क्पिल समोर आणून बदनामी करेल, असा धाक दाखविला़ यानंतरही वारंवार शारीरिक अत्याचार केला. पीडित युवतीस अत्याचारानंतर तीन महिन्याचा गर्भ राहिला. याप्रकरणी मंगळवारी भावेश येवले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरिक्षक संदीप आराक हे करीत आहेत़

Web Title: Rape by threatening video clips in Jalgaon