सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: January 28, 2015 13:48 IST2015-01-28T13:48:48+5:302015-01-28T13:48:48+5:30

मध्यप्रदेशातील रहिवासी व रोजगारानिमित्त औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन हद्दीत स्थायिक झालेल्या एका सावत्र बापाने आपल्या १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Rape of step-father's daughter | सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार

सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार

जळगाव : मध्यप्रदेशातील रहिवासी व रोजगारानिमित्त औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन हद्दीत स्थायिक झालेल्या एका सावत्र बापाने आपल्या १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील एक ४५ वर्षीय प्रौढ हा पत्नीसह काही महिन्यांपूर्वी जळगावातील औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्याला आला. आरोपीच्या पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर दोघांनी लग्न केले होते. त्या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा व दोन मुली आहेत. मात्र लग्न झाल्यानंतर तिन्ही मुले हे या महिलेच्या माहेरीच होते. काही दिवसांपूर्वी या महिलेची कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया झाल्याने ती माहेरी होती. या दरम्यान आरोपीने आपल्याला स्वयंपाक येत नसल्याने सावत्र मुलीला जळगावला पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्याच्या पत्नीने दोन्ही मुलींना आपल्या आईसोबत पाठविले. १७ जानेवारी रोजी रात्री या नराधमाने त्याच्या १२ वर्षीय सावत्र मुलीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने विरोध केला. या दरम्यान त्याने सावत्र मुलीचे हातपाय दोराने बांधून तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर त्याने १९ जानेवारी रोजी पुन्हा पीडित मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईला बोलवून घेत या घटनेची माहिती दिली. तपासाधिकारी के.बी. भुजबळ यांनी आरोपीला अटक केली आहे.

----------

घटनेनंतर पीडित मुलगी ही प्रचंड घाबरलेली असल्याने तिने आईला जळगावला बोलवून घेतले. आईने तिला विश्‍वासात घेतल्यानंतर पीडित बालिकेने हा धक्कादायक प्रकार सांगितला. 

Web Title: Rape of step-father's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.