शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

मुंबईच्या विवाहितेवर चाळीसगावात लॉजमध्ये बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 5:07 PM

दुसऱ्याच्या मोबाईलवर चुकून लागलेल्या रॉंग नंबर मुंबईतील २९ वर्षीय विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्थ करणारा ठरला. रॉंग नंबर लागलेल्या या नंबरच्या महिलेशी सुत जुळवून चाळीसगावच्या दोघांनी तिला बसस्थानकासमोरील विनायक लॉजवर नेऊन तिच्यावर तब्बल पाच दिवस अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देदोघांना पोलिसांकडून अटकघटनेने चाळीसगावात खळबळ

चाळीसगाव, जि.जळगाव : दुसऱ्याच्या मोबाईलवर चुकून लागलेल्या रॉंग नंबर मुंबईतील २९ वर्षीय विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्थ करणारा ठरला. रॉंग नंबर लागलेल्या या नंबरच्या महिलेशी सुत जुळवून चाळीसगावच्या दोघांनी तिला बसस्थानकासमोरील विनायक लॉजवर नेऊन तिच्यावर तब्बल पाच दिवस अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्यावर कोसळलेली ही आपबित्ती या पीडित महिलेने पतीला सांगितल्यावर मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्टेशनचा हा गुन्हा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. महिलेवर अत्याचार करणाºया दोघांपैकी एकाला धुळे, तर दुसºयाला चाळीसगाव येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेने चाळीसगावात खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती अशी की, संशयित आरोपी आकाश प्रल्हाद रोकडे रा.धुळे याने काही दिवसांपूर्वी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. हा फोन चुकून मुंबईतील चेंबूर भागात राहणाºया २९ वर्षीय महिलेला लागला. रॉंग नंबर लागला असे सांगत संभाषण संपले. त्यानंतर मात्र ती पीडित महिला रोकडे याच्याशी संपर्कात आली. दोघांमध्ये मोबाईलवरून बोलणे वाढले. माझे पतीशी जमत नाही, तो सतत मारहाण करतो, जीवन जगावेसे वाटत नाही, जीवाचे बरेवाईट करून घेईल, असे या पीडित महिलेले रोकडे याच्याशी बोलण्याच्या नादात सांगून टाकले. त्यावर रोकडे याने असे करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगत महिलेची सहानुभूती मिळवली. त्यानंतर दोघांमध्ये वेळोवेळी मोबाइलवरून संभाषण होत राहिले. ही संधी साधून रोकडे याने या पीडित महिलेला चाळीसगावी बोलावले. रोकडे याचा मित्र करण राजाराम राखपसरे रा.इंदिरानगर, चाळीसगाव याला ही गोष्ट सांगितली. चाळीसगावी ही महिला आली असता या दोघांनी तिला चाळीसगाव बसस्थानकासमोरील विनायक लॉजमध्ये नेऊन दि.१९ ते २३ जून दरम्यान वेळोवेळी संगनमताने या महिलेवर बलात्कार केला.या दरम्यान या पीडित महिलेच्या मोबाईलवर तिच्या पतीसह नातलगांचे फोन येत असत. मात्र संशयित करण राखपसरे व आकाश रोकडे हे दोघे महिलेला मोबाईलवरून बोलू देत नसत. या दोघांचा अत्याचार असह्य झाल्याने पीडित त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी धडपडत होती. अशात एक दिवस पतीचा फोन आला असता तिने तो उचलला व आपण भावनेच्या भरात चाळीसगावी कसे आले आणि आपल्यावर दोघांनी कसा अत्याचार केला, अशी माहिती दिली. आपल्यावर झालेल्या अत्याचारामुळे हबकलेल्या पीडित विवाहितेने दोघा संशयितांची नजर चुकवत नाशिक गाठले. तेथून त्र्यंबकेश्वर येथे गेली. तेथे पती आल्यावर त्याला गुदरलेली सर्व आपबित्ती सांगितली.महिलेवर वारंवार अत्याचार झाला असल्याने तिची प्रकृती बिघडली. तिच्यावर औषधोपचार केल्यानंतर पीडित महिला पतीसह मुंबईत गेली. तेथे त्यांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला. चुनाभट्टी पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित करण राजाराम राखपसरे व आकाश प्रल्हाद रोकडे या दोघांच्या विरोधात भादंवि कलम ३७६ प्रमाणे शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवून घेत तो चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडे वर्ग केला.चाळीसगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे, पो.ना. नितीन पाटील, पोकॉ राहुल गुंजाळ, राकेश पाटील,मझरद्दीन शेख यांच्या पथकाने पीडित महिलेवर अत्याचार करणाºया दोघा संशयितांपैकी आकाश रोकडे याला धुळ्याहून, तर करण राखपसरे याला चाळीसगाव येथून अटक केली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChalisgaonचाळीसगाव