रामदेववाडीतील ‘तो’ हल्लेखोर बाप जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 16:05 IST2017-06-06T15:59:28+5:302017-06-06T16:05:21+5:30

मेहरुण तलावाजवळ पकडला. पनवेल येथे पळून जाण्याची होती तयारी

Ramdevwadi's 'So' attacker father Zirband | रामदेववाडीतील ‘तो’ हल्लेखोर बाप जेरबंद

रामदेववाडीतील ‘तो’ हल्लेखोर बाप जेरबंद

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.6 : मुलाच्या डोक्यात ऊस तोडण्याचा कोयता टाकून त्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून फरार झालेल्या अनिल पुना जाधव (रा.रामदेववाडी, जळगाव) याला पनवेल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना मंगळवारी दुपारी एक वाजता सुशील मगरे या पोलीस कर्मचा:याने पाठलाग करुन पकडले. यावेळी जाधव याची मगरे यांच्याशी बराच वेळ झटापट झाली.

दारु मुळे लगA जुळण्यात अडचणी येत असल्याचे सांगणा:या विशाल जाधव (वय 23 रा.रामदेववाडी) या मुलाच्या डोक्यात त्याचे वडिल अनिल याने रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता ऊस तोडण्याचा कोयता टाकला होता. डोक्यात दोन घाव घातल्याने विशाल हा रक्तबंबाळ अवस्थेत जागेवरच बेशुध्द पडला. संशयित अनिल जाधव हा दोन दिवसापासून जळगाव येथील मेहरुण तलाव परिसरातच वावरत होता. मंगळवारी तो पनवेल येथे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती म्हसावद दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल सुशील मगरे यांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले.

Web Title: Ramdevwadi's 'So' attacker father Zirband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.