राम नगरातील महिलेवर प्राणघातक हल्ला
By Admin | Updated: October 15, 2015 00:16 IST2015-10-15T00:16:58+5:302015-10-15T00:16:58+5:30
जळगाव: पैशाच्या कारणावरुन सुरेखा सपकाळे या महिलेवर बुधवारी रात्री साडे दहा वाजता सिताराम कोळी याने सुर्याने मानेवर जोरदार प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

राम नगरातील महिलेवर प्राणघातक हल्ला
जळगाव: पैशाच्या कारणावरुन सुरेखा रवींद्र सपकाळे (वय ४०, रामनगर) या महिलेवर बुधवारी रात्री साडे दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सिताराम अभिमन कोळी (वय ४७, रा. डांभुर्णी, ता.यावल) याने सुर्याने मानेवर जोरदार प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हल्लेखोर कोळी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दगडांचा मारा करुन केली सुटका
रामनगरातील सुरेखा सपकाळे व सिताराम कोळी यांच्यात पैशावरुन काही तरी वाद होता. त्यातून बुधवारी रात्री सितारामने कृउबा समोरील पेट्रोल पंपाजवळ दारुच्या नशेत सुर्याने सपासप वार केले. घटनास्थाळवरील तरुणांवरही सुर्याने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही नागरिकांनी त्याच्यावर दगडांचा मारा सुरु केल्याने महिला त्याच्या तावडीतून निसटली. त्याच वेळी पेट्रोलिंगला असलेल्या पोलीस निरीक्षक सुनील कुराडे व सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांनी कोळीला ताब्यात घेतले तर महिलेला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले. जखमी महिलेची हल्लेखोरावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.