मंत्रालयावर मोर्चा काढणार
By Admin | Updated: November 17, 2014 12:11 IST2014-11-17T12:11:45+5:302014-11-17T12:11:45+5:30
आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी खांद्यावर झेंडा घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा वाल्मीकलव्य सेनेने दिला आहे.

मंत्रालयावर मोर्चा काढणार
जळगाव : आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी खांद्यावर झेंडा घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे प्रदेश अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांनी रविवारी झालेल्या बैठकीत केले आहे.
या बैठकीत टोकरे कोळी समाजाच्या सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. समाजाच्या विविध प्रश्नांवर यापूर्वी छेडण्यात आलेल्या जलसमाधी, रास्ता रोको, रेल्वे रोको, आत्मदहन आदी आंदोलनांची शासनाने दखल घेतलेली नाही. राज्यातील भाजप शासनाने आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या ज्वलंत प्रश्नाकडे तत्काळ लक्ष देऊन त्वरित सोडवणूक न केल्यास बैठकीत आगामी आंदोलनाबाबत ठराव पास करण्यात आला. या बैठकीत आदिवासी वाल्मीकलव्य सेनेतर्फे मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ, वसंत भोलाणकर, अरुण इंगळे, गुलाबराव बाविस्कर, मोहन सोनवणे, राजू सपकाळे, खन्ना कोळी, कमलाकर सोनवणे, भूषण सैंदाणे, रवींद्र कोळी आदी उपस्थित होते.