आरक्षणाच्या मागणीसाठी यावल येथे मुस्लीम आरक्षण समितीच्यावतीने मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:00 IST2018-01-06T11:56:47+5:302018-01-06T12:00:30+5:30
हजारो समाजबांधवांचा सहभाग

आरक्षणाच्या मागणीसाठी यावल येथे मुस्लीम आरक्षण समितीच्यावतीने मूक मोर्चा
ऑनलाईन लोकमत
यावल, जि. जळगाव, दि. 06- मुस्लीम समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी 6 रोजी सकाळी यावल येथे महाराष्ट्रीयन मुस्लीम आरक्षण समिचीच्यावतीने तहसील कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.
मुस्लीम समाज शिक्षणात मागे असल्याने त्यांना आरक्षण मिळाल्यास ते देशाच्या प्रगीतस हातभार लावू शकतील, असा सूर मोर्चानंतर झालेल्या सभेत उमटला.
सकाळी 11 वाजता आठवडे बाजार परिसरातून मोर्चास सुरुवात झाली. तहसील कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर तेथे निवासी नायब तहसीलदार वैभव पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर सभा होऊन मार्गदर्शन करण्यात आले.
मोर्चामध्ये मोहसीन खान, शेख इकबाल, इरफान खान, मसूद खान, वसीम अख्तर गणी, अझहर अली, अल्ताफ खान, सैयद ताबीज यांच्यासह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.