चाळीसगावच्या कोरोना योद्ध्यांना 'शिवनेरी’च्या राखीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:18 IST2021-08-23T04:18:59+5:302021-08-23T04:18:59+5:30

या भेटीमुळे कोरोना योद्धे भारावून गेले आहेत. एकूण दोन हजारांहून अधिक भाऊरायांना घरपोच बहिणीच्या वत्सल प्रेमाचा धागा म्हणून प्रतिभा ...

Rakhi gift of 'Shivneri' to the Corona warriors of Chalisgaon | चाळीसगावच्या कोरोना योद्ध्यांना 'शिवनेरी’च्या राखीची भेट

चाळीसगावच्या कोरोना योद्ध्यांना 'शिवनेरी’च्या राखीची भेट

या भेटीमुळे कोरोना योद्धे भारावून गेले आहेत. एकूण दोन हजारांहून अधिक भाऊरायांना घरपोच बहिणीच्या वत्सल प्रेमाचा धागा म्हणून प्रतिभा चव्हाण यांनी या राख्या पाठविल्या आहेत. राखीसोबत पाठविलेल्या पत्रात त्यांनी कोरोना योद्ध्यांच्या कामाचे कौतुक करतानाच त्यांना धीरही दिला आहे.

ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व शासकीय अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यांनाही राखीची भेट पाठवली.

चौकट

सुट्टीच्या दिवशी पोस्टमन बांधवांनी वाटप केल्या राख्या

रक्षाबंधनाची पर्वणी सर्वत्र रविवारी साजरी झाली. मात्र सुट्टी असूनही चाळीसगावच्या मुख्य पोस्टातील पोस्टमन बांधवांनी बहिणीच्या प्रेमाचा ओलावा असणारे हे ‘राखीचे धागे’ त्यांच्या बंधूंपर्यंत मोठ्या आनंदाने पोहोचविले. ‘सेवा ही धर्म’ हे पोस्ट विभागाचे ब्रीद पोस्टमन बांधवांच्या समर्पित कृतीतून स्पष्टपणे दिसून आले. पाचोरा, भडगाव आदी परिसरात जाऊनही राख्यांचे वाटप पोस्टमन बांधवांनी केले. पोस्टाला रविवारची सुट्टी असूनही दारात परगावी राहणाऱ्या भगिनींनी पाठविलेल्या राखींची पाकिटे घेऊन आलेल्या पोस्टमन बांधवांना पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. पोस्टमास्तर मनोज करंकाळ यांनी यशस्वी नियोजन केले.

220821\22jal_5_22082021_12.jpg

रविवारी सुट्टीच्या दिवशीही रक्षाबंधनाच्या पर्वणीवर राख्यांची वाटप करण्यासाठी सज्ज झालेले पोस्टमन बांधव. (छाया : जिजाबराव वाघ)

Web Title: Rakhi gift of 'Shivneri' to the Corona warriors of Chalisgaon