एरंडोल राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या राख्या पोहोचल्या आनंदवनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:45+5:302021-09-02T04:36:45+5:30
आपल्या पत्रात डॉ. आमटे यांनी म्हटले आहे की, आपल्या राजमाता जिजाऊ महिला मंडळाने आनंदवनातील दिव्यांग, दृष्टिहीन मुलांची आपण आवर्जून ...

एरंडोल राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या राख्या पोहोचल्या आनंदवनात
आपल्या पत्रात डॉ. आमटे यांनी म्हटले आहे की, आपल्या राजमाता जिजाऊ महिला मंडळाने आनंदवनातील दिव्यांग, दृष्टिहीन मुलांची आपण आवर्जून दखल घेतली, त्यांच्यासाठी राख्या पाठविल्यात त्याबद्दल मन:पूर्वक आभार. रक्षाबंधनाच्या छोटेखानी सोहळ्यात आपल्या राख्या या बालकांना बांधल्या. यानिमित्ताने आपले ऋणानुबंध अबाधित राहतील आणि आनंदाची अनुभूती देत राहतील. आपल्या पत्रात डॉ. आमटे पुढे लिहितात की, आज आपला देश कोरोनाच्या प्रलयकारी विळख्याने जखडलेला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने समस्त देशवासीय शासनाचे निर्बंध पाळू, एकजुटीने आणि आश्वासक प्रेमधारेने त्याच्यावर विजय मिळवू, अखिल विश्वातून त्याला हद्दपार करू. मंडळाच्या सर्व सभासदांचे आनंदवनी स्वागत....
संपर्क सहयोग स्वागत...
स्नेहादरासह -डॉ. विकास आमटे
सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा-आनंदवन
आनंदवनातील बालकांना राख्या मिळाल्या, त्या त्यांनी आनंदाने स्वीकारून बांधल्याने राजमाता जिजाऊ महिला मंडळातील सदस्यांना आनंद तर झालाच सोबतच सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून दिव्यांग, दृष्टिहीन, अनाथ बालकांना एका दिवसाचा, काही क्षणांचा आनंद मिळाला, याचेही खूप समाधान लाभले. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून इच्छा असूनदेखील कार्यक्रमांचे आयोजन करता आले नाही. राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे आदर्श जीवन डोळ्यासमोर ठेवूनच महिलांमधील जागृतीसाठी परिश्रमपूर्वक काम सुरू आहे. विधवा, परित्यक्ता महिलांना जीवन जगण्यासाठी सहकार्य करून, संकटांना सामोरे जाऊन खंबीरपणे उभे राहण्यासाठी मायेेची ऊब देणे हेच महत्त्वपूर्ण काम आहे. सदर उपक्रमासाठी राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या सचिव श्रीमती वंदना पाटील, अध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी परिश्रम घेतले.