राजुरी येथे तत्काळ औषधोपचारामुळे वाचले मोराचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 18:10 IST2017-07-27T18:10:05+5:302017-07-27T18:10:18+5:30
राजुरी शेतशिवारात आढळलेल्या आजारी मोरावर दोघा नागरिकांच्या प्रयत्नाने औषधोपचार होवू शकल्याने त्याचे प्राण वाचू शकले.

राजुरी येथे तत्काळ औषधोपचारामुळे वाचले मोराचे प्राण
ऑनलाईन लोकमत वरखेडी ता. पाचोरा,दि.27 : राजुरी शेतशिवारात आढळलेल्या आजारी मोरावर दोघा नागरिकांच्या प्रयत्नाने औषधोपचार होवू शकल्याने त्याचे प्राण वाचू शकले. बुधवारी प्रेमचंद पाटील व बालू पाटील यांना एक मोर आढळून आला त्याला उडता येत नसल्याने त्याला गावातील शाळेवर आणून डॉ.शिंपी यांना बोलवून त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. अशक्तपणामुळे त्याच्या पंखात बळ नव्हते तसेच उडतांना त्याचा एक पाय देखील लुळा पडत असल्याने तो जमिनीवर पडत असल्याचे दिसून आले. औषधोपचारानंतर त्याला पाचोरा येथील पक्षीमित्र आतिष चांगरे यांच्या सुपुर्द करण्यात आले.