दिव्या भोसले यांना राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:17 IST2021-03-10T04:17:12+5:302021-03-10T04:17:12+5:30

जळगाव : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांचा जागतिक महिला दिनी ...

Rajmata Jijau Adarsh Mahila Award to Divya Bhosale | दिव्या भोसले यांना राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार

दिव्या भोसले यांना राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार

जळगाव : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांचा जागतिक महिला दिनी निसर्ग-मित्र समिती व राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे, यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सक्षम महिला सन्मान हे दोन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यापैकी राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार हा प्रदुषण नियंत्रण अधिकारी सौजन्या पाटील, गट शिक्षण अधिकारी सुरेखा देवरे,चोपडा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनिषा जीवन चौधरी, धुळे मनपाच्या नगरसेविका वंदना भामरे , मनिषा किशोर डियालाणी यांच्या हस्ते देण्यात आला.

तसेच कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना , महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कोमल पाटील यांच्या हस्ते सक्षम महिला सन्मान देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी कार्याध्यक्ष आरोही नेवे, रावेर अध्यक्ष भाग्यश्री बाविस्कर, प्रीती चव्हाण, शिवानी बाविस्कर आदी उपस्थित होते.

Web Title: Rajmata Jijau Adarsh Mahila Award to Divya Bhosale