त्यावेळी माझा भाला अर्शदकडे होता - नीरज
नवी दिल्ली : ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा याने त्याच्या भाल्याबाबतचा किस्सा आता जाहीर केला आहे. जेव्हा ऑलिम्पिक फायनल्स सुरू होती, तेव्हा नीरजचा भाला त्याच्याकडे नव्हता. तो भाला शोधू लागला. त्याचवेळी त्याला तो भाला पाकिस्तानच्या अर्शद नदीम याच्याकडे होता. त्यानंतर नीरजने त्याला म्हटले, भाई हा भाला माझा आहे. मला तो परत कर, मला त्याच्यानेच थ्रो करायचा आहे.’ त्यानंतर त्याने तो भाला लगेच नीरजला परत केला आणि नीरजने ८७.५८ मीटरची फेक करत सुवर्ण पदक पटकावले.
फलंदाज टी-२० लीगसाठी आक्रमक खेळ करतात - गावसकर
नवी दिल्ली : खेळाडूंकडे आयपीएल, बिग बॅश आणि आता द हंड्रेड आहे. खेळाडूंना आता चिंता नाही. त्यामुळेच फलंदाज आता आक्रमक खेळ करत असल्याचे विधान भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केले आहे. ते म्हणाले की, फलंदाज विचार करतात, मी फटकेबाजी केली आणि झटपट धावा केल्या. असे करताना बाद झालो तरी चालेल, फरक पडत नाही.’