निंबोल येथे राजयोग शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 16:45 IST2020-12-27T16:45:07+5:302020-12-27T16:45:52+5:30

निंबोल येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीज विद्यालयात राजयोग शिबिर घेण्यात येत आहे.

Raja Yoga Camp at Nimbol | निंबोल येथे राजयोग शिबिर

निंबोल येथे राजयोग शिबिर

ऐनपूर : निंबोल, ता.रावेेर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीज विद्यालय, शिवरचना भवनात राजयोग शिबिर घेण्यात येत आहे. यात तणावमुक्तीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
रावेर सेंटरच्या संचालिका लता दिदी यांच्या प्रेरणेने आयोजक ईश्वरभाई यांनी नियोजन केले. बी.के.विजयभाई यांनी राजयोग शिबिरांचे साप्ताहिक पाठ्यक्रम  घेतले.  
वर्तमान तणाव, अशांती, भय, अचानक मृत्यू, अनिश्चितता या काळात मनुष्याच्या जीवनात खरी शांती, खुशीही नाहीशी झाली आहे. ती प्राप्त करण्यासाठी "राजयोग" ही विधी योग्य आहे, असे बी.के.विजयभाई यांनी सांगितले.
या शिबिराचा लाभ निंबोलचे  ग्रामस्थ घेत आहेत. 
सचिन पाटील, विजय पाटील, गोपाल पाटील, नामदेव  लवंगे, श्रीराम तायडे, ज्ञानेश्वर राठोड, अरुण महाजन, भूषण  पाटील, विटवा येथील अनिल चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: Raja Yoga Camp at Nimbol