पहूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:13 IST2021-05-31T04:13:29+5:302021-05-31T04:13:29+5:30

पहूर, ता. जामनेर : पहूर येथे शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर या ठिकाणी ...

Rain with strong winds at Pahur | पहूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस

पहूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस

पहूर, ता. जामनेर : पहूर येथे शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर या ठिकाणी बसस्थानक परिसरात औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम सुरू असून या ठिकाणी पाण्याला प्रवाह न मिळाल्याने परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.

दोन ते तीन तास जोरदार पाऊस झाला. रस्त्याचे काम करताना पाणी वाहून जाण्याबाबत विचार न केल्याने पाणी शिरून परिसरात असलेल्या महावीर मेडिकलचे नुकसान झाले. रात्रीच मेडिकलचे संचालक विजय इंदरचंद जैन यांनी जेसीबीच्या साहाय्याने पाणी प्रवाहित केले. त्यामुळे पुढील होणारी वित्तहानी टळली असून औषधी व फर्निचरचे नुकसान झाल्याचे जैन यांनी सांगितले आहे. याच ठिकाणी मगन गजानन मिस्त्री यांच्या फर्निचरच्या दुकानात पाणी शिरून साहित्याचे नुकसान झाले. रस्त्याचे काम सुस्थितीत न केल्यास स्थानिकांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Rain with strong winds at Pahur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.