भुसावळजवळ इंजिनसह ट्रॅकमशिन रूळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प
By Admin | Updated: January 13, 2017 00:28 IST2017-01-13T00:27:35+5:302017-01-13T00:28:18+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पगमार- खंडवा दरम्यान गुरूवारी रात्री

भुसावळजवळ इंजिनसह ट्रॅकमशिन रूळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पगमार- खंडवा दरम्यान गुरूवारी रात्री ११ वाजेनंतर अप मार्गावर लोहमार्ग तपासणी मशिन (ट्रॅक मशिन) इंजिनसह घसरल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
परिणामी दिल्लीकडून येणाऱ्या गाड्यांचे नियोजन कोलमडले आहे. वाहतूक ठप्प झाल्याचा फटका पाच मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना बसला आहे.
दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच भुसावळ येथून रेल्वेचे मदत पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. तर डीआरएमसह वरिष्ठ अधिकारी नियंत्रण कक्षात रात्री उशिरापर्यंत थांबून होते.