रेल्वेकडून भाडेतत्तावर मालगाडींही उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:05+5:302021-02-09T04:19:05+5:30

पोलीस गस्त वाढविण्याची मागणी जळगाव : शहरातील मु. जे. महाविद्यालयाच्या परिसरात गेल्या महिन्यात घरफोडीची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण ...

Railway freight trains will also be available | रेल्वेकडून भाडेतत्तावर मालगाडींही उपलब्ध होणार

रेल्वेकडून भाडेतत्तावर मालगाडींही उपलब्ध होणार

पोलीस गस्त वाढविण्याची मागणी

जळगाव : शहरातील मु. जे. महाविद्यालयाच्या परिसरात गेल्या महिन्यात घरफोडीची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा-महाविद्यालयाचा हा परिसर असल्याने पोलीस प्रशासनाने या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधुन येत आहे.

पाचोरा मार्गावर जादा बसेस सोडण्याची मागणी

जळगाव : जळगाव आगारातून पाचोरा मार्गावर कमी बसेस अल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. वेळेवर बसेस नसल्यामुळे नागरिकांना खाजगी वाहनांना जादा पैसे

मोजून प्रवास करावा लागत आहे. तरी महामंडळ प्रशासनाने या मार्गावर जादा बसेस सोडाव्यात,अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी

जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनसमोरील पोलीस चौकी बंद असल्यामुळे चोरी-लुटमारीच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी पोलीस प्रशासनाने २४ तास पोलीस चौकी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांमधुन व्यक्त होत आहे.

सिंग्रल यंत्रणा सुरू करण्याची मागणी

जळगाव : शहरातील अनेक ठिकाणचे सिंग्रल बंद असल्यामुळे वाहने सुसाट धावत आहेत. यामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी वाहतूक विभागाने सिंग्रल यंत्रणा सुरू करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.

Web Title: Railway freight trains will also be available