रेल्वे अभियंता लाच प्रकरण, अनेक अधिकाऱ्यांचे जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:44+5:302021-08-23T04:20:44+5:30
दरम्यान, आरोपींच्या अटकेनंतर पथकाने त्यांच्या पुणे, बर्हाणपूर, भुसावळ येथील घराची झाडाझडती घेत कागदपत्रांसह मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली होती. ...

रेल्वे अभियंता लाच प्रकरण, अनेक अधिकाऱ्यांचे जीव टांगणीला
दरम्यान, आरोपींच्या अटकेनंतर पथकाने त्यांच्या पुणे, बर्हाणपूर, भुसावळ येथील घराची झाडाझडती घेत कागदपत्रांसह मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली होती. त्यांची सीबीआय कोठडी २० रोजी संपल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर २१ रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता या नाट्यमय घडामोडीनंतर २१ रोजी त्यांना न्या. आर. एम. जाधव यांच्या न्यायालयाने २५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामिनावर सुटका केली.
ॲड. बी. डी. गामोत यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, न्यायालयाने तो मंजूर केला.
आणखीन किती अधिकारी?
जेंटलमॅन अधिकाऱ्यांची ओळख असलेल्या रेल्वे विभागात लाचखोर अभियंता गुप्तावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्यासोबत आणखीन किती अधिकाऱ्यांचा समावेश आहे याबाबत दिवसेंदिवस नवनवीन चर्चा रेल्वे कर्मचाऱ्यांना ऐकावयास मिळत आहेत. याप्रकरणी जोपर्यंत संपूर्ण चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येत नाही तोवर अनेक अधिकाऱ्यांचे जीव टांगणीला राहतील.