रेल्वे डमी जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:53+5:302021-09-25T04:15:53+5:30
मुंबईत सवलत, आम्हाला का नाही रेल्वेच्या भुसावळ विभागातून गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा व चाळीसगाव येथून हजारो प्रवासी जळगावला अफडाऊन ...

रेल्वे डमी जोड
मुंबईत सवलत, आम्हाला का नाही
रेल्वेच्या भुसावळ विभागातून गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा व चाळीसगाव येथून हजारो प्रवासी जळगावला अफडाऊन करत असतात. यातून रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनाचे कारण सांगून रेल्वेने मासिक पास व जनरल तिकीट अद्यापही बंद ठेवल्याने, या प्रवाशांना विशेष गाड्यांना जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. असे असताना रेल्वे प्रशासन भुसावळच्या प्रवाशांचा विचार न करता, मुंबईतल्या प्रवाशांना सवलत देते, तर मग आम्हाला का नाही, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
इन्फो :
कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने मुंबईतल्या प्रवाशांप्रमाणे भुसावळ विभागातल्या प्रवाशासांठीही पॅसेंजर गाड्या सुरू करणे गरजेचे आहे. तसेच ज्या प्रवाशांनी लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्यांना मासिक पासही देणे गरजेचे आहे. सध्या या प्रवाशांना कुठल्याही सुविधा नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बाळासाहेब वाबळे, प्रवासी
दररोज चाळीसगाव, पाचोरा या भागातून हजारो प्रवासी जळगावला नोकरी, व्यावसायानिमित्त ये-जा करीत असतात. रेल्वेने मात्र कोरोनाचे कारण पुढे करून, पॅसेंजर अद्यापही बंद ठेवल्यामुळे या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यात जनरल तिकीटही मिळत नसल्याने, या प्रवाशांना खासगी वाहनांनी जादा पैसे मोजून, जळगावला यावे लागत आहे.
दुष्यंत भाटेवाल, प्रवासी
रेल्वे प्रशासन एकीकडे कोरोनाचे नाव सांगून, पॅसेंजर सुरू करत नसली, तरी सध्या ज्या गाड्या सुरू आहेत. त्या गाड्याना तर प्रचंड गर्दी आहे. त्यात कुठलेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसून, प्रवासी मास्कही घालतांना दिसून येत नाहीत. त्यामुळे रेल्वेने कोरोनाचे नाव सांगून, मासिक पास किंवा पॅसेंजर सुरू न करण्याचे निर्णय मागे घ्यायला हवेत. तसेच या मागणीसाठी प्रवाशांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
योगेश पाटील, प्रवासी
इन्फो :
राज्य शासनाच्या आदेशानंतर मासिक पास सुरू होणार
मुंबईत लोकल सुरू झाल्या, मासिक पास देण्यात येत आहे. भुसावळ विभागातील प्रवाशांना केव्हा मिळणार, याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने भुसावळ जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी राज्य शासन व केंद्र शासन परवानगी देईल, तेव्हाच मासिक पास व पॅसेंजर सुरू होणार असल्याचे सांगितले. विशेषत : यामध्ये राज्य शासनाची परवानगी प्रथम मिळणे गरजेच असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.