किन्ही येथे गावठी दारू अड्ड्यावर धाड, रसायन नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:11+5:302021-06-21T04:13:11+5:30
या शिवारात गावठी दारू भट्टी सुरू असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत ९१ हजार ९०० रुपये किमतीचे ...

किन्ही येथे गावठी दारू अड्ड्यावर धाड, रसायन नष्ट
या शिवारात गावठी दारू भट्टी सुरू असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत ९१ हजार ९०० रुपये किमतीचे गावठीचे रसायन नष्ट केले. ही कारवाई शनिवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास करण्यात आली. किन्ही शिवारात नितीन चौधरी यांच्या शेताजवळ नाल्यात सार्वजनिक ठिकाणी अन्सार रशीद गवळी (रा.कन्हाळा) हा गावठी हातभट्टी दारू गाळण्याची भट्टी रचून दारू गाळत असताना पोलिसांनी कारवाई करीत १२ ड्रममधील दोन हजार ३०० लीटर रसायन नष्ट केले.
आरोपीविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि रूपाली चव्हाण, एएसआय सुनील चौधरी, हवालदार विठ्ठल फुसे, संदीप बडगे, गणेश राठोड, उमेश बारी, होमगार्ड उमेश सोनवणे, अमोल जयकर, जगदीश पाटील आदींच्या पथकाने केली.