वरखेडी येथे जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST2021-06-28T04:13:41+5:302021-06-28T04:13:41+5:30

पिंपळगाव (हरे), ता. पाचोरा : वरखेडी येथे रविवारी दुपारी ३;३०च्या सुमारास कुऱ्हाड रोडला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडच्या बाजूला सुरू ...

Raid on gambling den at Varkhedi | वरखेडी येथे जुगार अड्ड्यावर धाड

वरखेडी येथे जुगार अड्ड्यावर धाड

पिंपळगाव (हरे), ता. पाचोरा : वरखेडी येथे रविवारी दुपारी ३;३०च्या सुमारास कुऱ्हाड रोडला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडच्या बाजूला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी धाड टाकून रुपये ५३ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

यावेळी आरोपी आनंदा केशव महाजन (४३, भातखेडा, ता. भडगाव), मधुकर नथ्थू धनगर (४३), सचिन अशोक पाटील (३०, दोघे रा. वरखेडी), समाधान अमृत पाटील (३०, लोहारी), शरद रामू शिंदे (३७) व सतीश लक्ष्मण शिंदे (२९, दोघे जामनेर) हे मन्ना जुगार खेळताना आढळून आले.

त्यांना मुंबई जुगार ॲक्ट १२-अ प्रमाणे अटक केली आहे. ही कारवाई पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पाचोरा उपनिरीक्षक गणेश चौबे, हे. कॉ. प्रकाश पाटील, पोलीस नाइक किशोर पाटील, हे. कॉ. रणजीत पाटील, संदीप पाटील, सुनील पाटील, किरण पाटील यांनी केली. पंचनामा पो. हे. कॉ. रणजीत पाटील यांनी केला.

Web Title: Raid on gambling den at Varkhedi