नांदेडला धाडसत्र २६ हजार हजाराचे दारूचे कच्चे रसायन नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:45+5:302021-09-06T04:19:45+5:30

नांदेड, ता. धरणगाव : धरणगाव पोलीस स्टेशनला नुकतेच रुजू झालेले नूतन पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी ५ रोजी भल्या ...

Raid chemicals worth Rs 26,000 destroyed in Nanded | नांदेडला धाडसत्र २६ हजार हजाराचे दारूचे कच्चे रसायन नष्ट

नांदेडला धाडसत्र २६ हजार हजाराचे दारूचे कच्चे रसायन नष्ट

नांदेड, ता. धरणगाव : धरणगाव पोलीस स्टेशनला नुकतेच रुजू झालेले नूतन पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी ५ रोजी भल्या पहाटे नांदेडलगतच्या तापी नदीच्या खोऱ्यामध्ये गावठी दारूविरुद्ध वॉशआऊट मोहीम राबवून २६ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट केले.

रविवारी पहाटे दोन ते तीन तास राबवण्यात आलेल्या गावठी दारूविरुध्दच्या वॉशआऊट मोहिमेत स्वत: पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक करीम सैय्यद, पो.ना. मिलिंद सोनार, पो.कॉ. विनोद संदानशिव, प्रवीण पाटील व वैभव बाविस्कर यांनी भाग घेऊन तापी नदीकाठचा भाग पिंजून काढून २६ हजार रुपये किमतीचे २०० लीटर मापाच्या १३ प्लॅस्टिकच्या बॅरलमधील दारू गाळण्यासाठीचे गूळ- नवसागर मिश्रित कच्चे रसायन नष्ट केले.

पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

050921\05jal_7_05092021_12.jpg

नांदेड येथील जप्त करण्यात आलेल्या बॅरलांसोबत पो. नि. शंकर शेळके व धाडसत्रात सहकारी पोलीस कर्मचारी.

Web Title: Raid chemicals worth Rs 26,000 destroyed in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.