शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग : गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 20, 2015 01:27 IST2015-09-20T01:27:15+5:302015-09-20T01:27:15+5:30
धुळे : भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग : गुन्हा दाखल
धुळे : भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वरिष्ठ सहकारी विद्याथ्र्यानी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याची रॅगिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने अनोळखी विद्याथ्र्यावर महा.रॅगिंग करण्यास प्रतिबंध 1999 चे कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.गिरीश विठ्ठल ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाविद्यालयाच्या वसतिगृहात 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2015 या काळात वरिष्ठ सहकारी विद्याथ्र्यानी प्रथम वर्षाच्या विद्याथ्र्याची रॅगिंग केली. यासंदर्भात रॅगिंग झालेल्या विद्याथ्र्यानी तक्रार केल्यानंतर महाविद्यालयाच्या कमिटीने चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या संदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.