रॅगिंगप्रकरणी विद्याथ्र्याचे जबाब नोंदवूनही धागे गवसेनात

By Admin | Updated: September 21, 2015 00:42 IST2015-09-21T00:42:18+5:302015-09-21T00:42:18+5:30

धुळे : भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्याथ्र्याची वरिष्ठ सहकारी विद्याथ्र्यानी रॅगिंग

In the ragging case, the thread is also recorded by the Gavesten | रॅगिंगप्रकरणी विद्याथ्र्याचे जबाब नोंदवूनही धागे गवसेनात

रॅगिंगप्रकरणी विद्याथ्र्याचे जबाब नोंदवूनही धागे गवसेनात

धुळे : भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्याथ्र्याची वरिष्ठ सहकारी विद्याथ्र्यानी रॅगिंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दुस:या दिवशी महाविद्यालयातील विद्याथ्र्याचे जाब-जबाब नोंदवून घेतले. मात्र, त्यात पोलिसांना ठोस धागेदोरे गवसले नाहीत. म्हणून तपासाला योग्य दिशा मिळत नसल्याचे पोलीस सूत्रांनी लोकमत

ला सांगितले.

या प्रकारासंदर्भात प्रथम वर्षातील कोणत्या तरी विद्याथ्र्याने थेट वैद्यकीय संचालनालयाकडे ई-मेलने तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन संचालनालयाने महाविद्यालयास चौकशीच्या सूचना केल्या. त्यानंतर महाविद्यालयाने या प्रकाराच्या चौकशीसाठी चार प्राध्यापकांची समिती नियुक्त केली. या समितीने केलेल्या प्राथमिक चौकशीत रॅगिंग झाल्याचे आढळले.

तक्रारदाराचा शोध सुरू

पोलीस मूळ तक्रारदाराचा शोध घेत असून तो समोर आल्यानंतर रॅगिंग घेणा:या विद्याथ्र्याची नावे आपोआपच समोर येणार आहेत. तक्रारदाराचे नाव सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे समजते. पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात मात्र, तक्रारदाराविषयी माहिती मिळालेली नाही. या प्रकरणाचे फिर्यादी डॉ.गिरीश ठाकरे हे शासकीय कामाने पुण्याला गेले असल्याने रविवारी तपासकामात अडथळा आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: In the ragging case, the thread is also recorded by the Gavesten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.