तीन मुलांची आई प्रियकरासोबत ‘रफूचक्कर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 16:58 IST2017-09-24T16:55:45+5:302017-09-24T16:58:55+5:30
प्रियकराने बायकोला तर महिलेने नवºयाला सोडले

तीन मुलांची आई प्रियकरासोबत ‘रफूचक्कर’
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२४ : शौचास जावून येते असे सांगून तीन मुलांची आई असलेली महिला शेजारीच राहणाºया प्रियकरासोबत ‘रफूचक्कर’ झाल्याची घटना शहरापासून जवळच असलेल्या एका गावात घडली. महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे शेजारीच राहणाºया दोन मुलांचा बाप असलेल्या तरुणाशी सूत जुळले होते. ते दोघ प्रेमात आकंठ बुडाले होते. दोन्ही कुटुंबाचा विरोध होणार असल्याने प्रियकराने त्याची पत्नी व दोन मुलांना सोडले तर त्याच्या प्रेयसीने तीन मुले व पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी रात्री दहा वाजता ही महिला शौचास जावून येते असे सांगून घराबाहेर पडली.
रात्री उशीर झाला तरी अजून का परत येत नसल्याने पती व नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र कुठेही आढळून आली नाही. दरम्यान, शेजारीच राहणारा दोन मुलांचाही बाप गायब झाल्याचे लक्षात आले. दोघांमधील संबंधाची दोन्ही कुटुंबांना कुणकुण लागलेलीच होती. त्यामुळे महिलेच्या पतीने रविवारी सकाळी नऊ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे व सहायफ फौजदार राजाराम पाटील यांना झाल्याप्रकाराची माहिती दिली. पतीच्या तक्रारीवरुन पत्नी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.