भुसावळात राधाराणी जन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:20 IST2021-09-16T04:20:59+5:302021-09-16T04:20:59+5:30
भुसावळ : शहरातील श्री वेंकटेश बालाजी मंदिरात मंगळवारी संध्याकाळी राधाअष्टमीनिमित्ताने राधाराणी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कृष्ण जन्माष्टमीनंतर १५ ...

भुसावळात राधाराणी जन्मोत्सव साजरा
भुसावळ : शहरातील श्री वेंकटेश बालाजी मंदिरात मंगळवारी संध्याकाळी राधाअष्टमीनिमित्ताने राधाराणी जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
कृष्ण जन्माष्टमीनंतर १५ दिवसांनी राधाराणीचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही राधाराणी भक्तवृंदांद्वारे मधुर भजन प्रस्तुत करण्यात आले. सुंदर पाळणा सजवून व भजन गाऊन उत्सव साजरा करण्यात आला. सर्व महिला भक्तांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती.
यावेळी राधेश्याम लाहोटी, बृजमोहन अग्रवाल, सुनील लाहोटी, संजय अग्रवाल, जे. बी. कोटेचा, संजय लाहोटी, राजेश लढ्ढा, गोपाल तिवारी, रत्नाकांता अग्रवाल, शशी लाहोटी, स्नेहा लढ्ढा, वीणा लाहोटी, हर्षदा काबरा, भारती राठी, पूनम काबरा, प्रीती हेडा, आरती हेडा, आभा दरगड, पद्मा दरगड, संजीवनी लाहोटी, सुरभी लाहोटी, प्रीती अग्रवाल, श्यामलता लढ्ढा, राजेश्री लढ्ढा, सोना काबरा, सुनीता चांडक, मनीषा लाहोटी, निर्मला लाहोटी, सुनीता दरगड, शोभा तिवारी, मंगला शर्मा, सुनीता मंत्री, योगीता हेडा यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.